वृक्ष लागवड

news details

सोलापूर जिल्हा हिरवा व पर्यावरण समृद्ध व्हावा यासाठी बापूंचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर सर्वप्रथम येथील वृक्षतोड थांबवायास हवी तसेच अधिकाधिक झाडे लावली जाऊन त्यांचे संगोपन व संवर्धन करणेही तेवढेच महत्वाचे असते. यासाठी २०१२ या वर्षापासून पासून सोलापूर मध्ये 'वृक्ष संगोपन' योजना सुरु करण्यात आली. विविध संस्था, गृहनिर्माण सोसायटी यांना या योजनेत सहभागी करून घेण्यात आले.

या योजनेत सहभागी झालेल्या सोसायटी व संस्थांना झाडे लावण्यासाठी व त्यांचे संगोपन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्यांनी लावलेल्या प्रत्येक झाडामागे दर वर्षी १०० रुपये निधी देण्यात येतो. आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात २ कोटी वृक्ष लागवड करण्यात आली त्यावेळी केवळ दक्षिण सोलापूरमध्ये दोन तासात २४ हजार वृक्ष लावण्याचा विक्रम करण्यात आला.

व्हिजन सोलापूरमध्ये सहभागी होण्यासाठी व आपल्या प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी येथे संपर्क करा.