जलसंधारण

news details

मानवी जीवनाची सर्वात मोठी गरज म्हणजे पाणी. आज पाण्याची परिस्थिती सर्वत्र गंभीर बनत चालली आहे. एकीकडे विकासाकडे वाटचाल सुरू असताना पाण्याचा प्रश्न मात्र दिवसेंदिवस मोठा होत चालला आहे. यावर वेळीच उपाय केले नाहीत तर भविष्यात पाण्याचे मोठे संकट समाजापुढे उभे राहील. लोकसहभागातून पुढाकार घेत बापूंनी 'पाणी जिरवा' या योजने अंतर्गत अनेक कामे केली.

ओढे, तलाव, बंधारे यांसारख्या जल स्रोतांमध्ये साठणार्‍या गाळामुळे त्यांची साठवण क्षमता कमी होते. यासाठी सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील होटगी, विंचूर, निंबर्गी अशा अनेक ठिकाणी ओढे, तलाव, बंधाऱ्यांचे रुंदीकरण, खोलीकरण, सरळीकरण केले गेले. या कामातून हजारो टन गाळ काढला गेला व त्यामुळे या जलस्रोतांची साठवण क्षमता अनेक पटींनी वाढून आसपासच्या भागातील पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत झाली आहे.

व्हिजन सोलापूरमध्ये सहभागी होण्यासाठी व आपल्या प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी येथे संपर्क करा.