अन्नपूर्णा योजना

news details

ज्येष्ठ नागरिक म्हणजे समाजाचा आधार. परंतु ज्या ज्येष्ठांना कौटुंबिक आधार नाही त्यांच्या वाटेला उपेक्षा येऊ नये, त्यांचे हाल, उपासमार होऊ नयेत यासाठी 'अन्नपूर्णा योजना' राबविली जाते. या अंतर्गत सुमारे ५०० वृध्द व निराधार ज्येष्ठ नागरिकांना दररोज दोन वेळा मोफत भोजन घरपोच पुरविले जाते.

सोलापूरसह उस्मानाबादमध्ये ही सेवा गेली ५ वर्षे अविरतपणे सुरु आहे. त्या निराधार माता पित्यांचा आशीर्वाद बापूंना लाभत आहे. या सेवेलाही आता मोठ्या प्रमाणावर जनसहभाग प्राप्त होत असून या कार्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच जाईल.

व्हिजन सोलापूरमध्ये सहभागी होण्यासाठी व आपल्या प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी येथे संपर्क करा.